• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

'माझ्या विषयात का पडतोस?' म्हणून घातला वाद; तिघांविरुद्ध उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
May 24, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: येथील मलंग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यालयात घुसून एका पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘तू माझ्या विषयात सहभाग का घेतोस?’ अशी विचारणा करत एका महिलेसह तिघांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात वंचितचे पदाधिकारी गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पक्ष कार्यालयात भरदिवसा राडा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा शहरातील जवाहर शास्त्री नगर येथील रहिवासी असलेले फिर्यादी राम सैदा गायकवाड (वय ४९) हे २२ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मलंग कॉम्प्लेक्समधील वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यालयात बसले होते.

यादरम्यान आरोपींनी अचानक कार्यालयात प्रवेश केला. “तू माझ्या विषयात विनाकारण सहभाग का घेतोस?” असे म्हणत त्यांनी राम गायकवाड यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

लोखंडी रॉडने बेदम मारहाण; जीवे मारण्याची धमकी

हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी कार्यालयातच गायकवाड यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यावर आणि शरीरावर लोखंडी रॉडचे प्रहार झाल्याने राम गायकवाड हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. हल्ला केल्यानंतर “पुन्हा नडल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

गुन्हा दाखल झालेले आरोपी:

१. जयशंकर कांबळे (रा. हल्लाळी, ता. निलंगा, जि. लातूर; सध्या मुक्काम- बँक कॉलनी, उमरगा)

२. संघर्ष कांबळे (रा. उमरगा)

३. पंचशिला कांबळे (रा. उमरगा)

उमरगा पोलिसांत गुन्हा नोंद

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या राम गायकवाड यांनी २३ मे रोजी उमरगा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११८(२) (घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) (जीवे मारण्याची धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. राजकीय पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या हिंसक हल्ल्यामुळे पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

उमरगा तालुक्यात शेतातील माती टाकण्याच्या वादातून चाकू हल्ला; मळगीवाडीत आई-वडिलांसह तरुण गंभीर जखमी

Next Post

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई

October 15, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला

October 15, 2026
 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

October 15, 2026
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

October 14, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई
  • नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
  • उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला
  •  तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!
  • ‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!