• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

admin by admin
October 14, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर / धाराशिव |  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात घडलेल्या लज्जास्पद प्रकारावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘चौकशीचे आदेश’ दिल्याची आव आणणारी बातमी म्हणजे केवळ स्वतःचे अंग काढून घेण्याचा आणि प्रकरणावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका आता होऊ लागली आहे. मंदिरातील पवित्र गाभाऱ्यात सोलापूरच्या कुख्यात मटका बुक्कीमालकाला रेड कार्पेट घालणारे आणि बनावट पासेस विकून लाखो रुपयांची मलई लाटणारे दुसरे तिसरे कोणी नसून, खुद्द आमदार राणा पाटील यांचे खाजगी सचिव सुधीर जमदाडे असल्याचा स्पष्ट आरोप ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’ने अधिकृत तक्रारीत केला आहे. स्वतःचा उजवा हातच या महाघोटाळ्यात रंगेहात अडकलेला असताना, आमदार दिल्लीतून चौकशीच्या फुका धमक्या कोणाला दाखवत आहेत, असा संतप्त सवाल धाराशिवच्या जनतेतून विचारला जात आहे.

स्वतःच्या पीएवर थेट आरोप; मग आदेशाचे ढोंग कोणासाठी?

श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम-परमेश्वर यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अधिकृत निवेदनात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक (पीए) सुधीर जमदाडे यांचे नाव उघडपणे नमूद केले आहे. तडीपार गुंडाला आणि मटका बुक्कीमालकाला गाभाऱ्यात थेट प्रवेश मिळवून देण्यात हाच पीए अग्रभागी होता, असा गंभीर आरोप पुजाऱ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर आमदारांच्या कोट्यातून मिळालेल्या व्हीआयपी पासेसची काळ्या बाजारात परराज्यातील धनदांडग्यांना विक्री करण्याचे रॅकेट कोणाच्या आशीर्वादाने चालवले जात होते? आमदारांच्या अधिकारातील पासेस विकण्याची हिंमत पीए कोणाच्या बळावर करतो? या सर्व गैरव्यवहारांची पाळेमुळे नेमकी कोणापर्यंत पोहोचली आहेत, याचे उत्तर आमदार जनतेला देणार का?

फक्त माध्यमांत हवाबाजी; जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले पत्र कुठे आहे?

दिल्लीत बसून “मी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीच्या सूचना दिल्या” असा आव आणणाऱ्या आमदारांनी ते अधिकृत चौकशीचे पत्र आजतागायत सार्वजनिक का केले नाही? माध्यमांमध्ये केवळ सोयीस्कर बातम्या पेरून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रयत्न आहे का? केवळ प्रेस नोट काढून आणि पोकळ शब्दांचे बुडबुडे उडवून निष्पक्ष चौकशी होत नसते. जर आमदारांचे हात स्वच्छ असतील, तर त्यांनी आपल्या लाडक्या पीएच्या विरोधात स्वतःहून भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला आणि पोलिसांना का दिले नाहीत, असा रोखठोक सवाल उपस्थित होत आहे.

विश्वस्त पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाणार का?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापनात आणि निर्णयप्रक्रियेत आमदार स्वतः महत्त्वाच्या पदावर आहेत. ज्या संस्थानच्या गाभाऱ्यात सामान्य भाविक उन्हातान्हात तासनतास रांगेत खितपत पडतो, तिथेच आमदारांचे स्वीय सहाय्यक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व्हीआयपी दर्शन घडवून आणतात. हा केवळ नियमांचा भंग नसून देवीच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी केलेला अक्षम्य द्रोह आहे. स्वतःच्या कार्यालयातील व्यक्तीवर एवढे गंभीर गुन्हेगारी आरोप झाल्यानंतर, आमदारांनी आपल्या पदावर बसून चौकशीचा देखावा मांडणे म्हणजे संशयिताला संरक्षण देण्यासारखेच आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार राणाजगजितसिंह पाटील तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा देणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Previous Post

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

October 14, 2026
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

October 14, 2026

Recent Posts

  • ‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?
  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
  • तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!