शिराढोण – रांजणी येथील नवीन पेट्रोल पंपासमोर एका भीषण अपघातात मोटरसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात पिकअप चालकाने हायगयी आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मोटरसायकलला धडक दिल्याने हा अपघात घडला. शिराढोण पोलीस ठाण्याने अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
रहीम राजू शेख (वय २२ वर्षे, व्यवसाय: खाजगी नोकरी, भारत फायनान्स, राहणार: लोहटा पूर्व, तालुका: कळंब, जिल्हा: धाराशिव) व लक्ष्मण हानुमंत लाचपुवार (राहणार: लिंबुर, निजामाबाद, आंध्रप्रदेश) हे दि. ११ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ८.३० वाजता मोटरसायकल क्र. एमएच २५ एयु ३७८ वरून जात असताना, रांजणी कारखान्याच्या पुढे नवीन पेट्रोल पंपासमोर पिकअप क्र. एमएच २५ एजे ००४६ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात लक्ष्मण लाचपुवार गंभीर जखमी होऊन ठार झाले, तर रहीम शेख किरकोळ जखमी झाले. रहीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १५ जुलै २०२४ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १०६, १२५(ए), २८१ सह १३४ अ.ब. १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (अ) मृत्यूची हत्या, २७९ आणि ३३८ वाहतूक कायद्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.