नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एका व्यक्तीची मोटरसायकल आणि दुसऱ्या व्यक्तीची दोन बकरी चोरी झाली आहे.
पहिल्या घटनेमध्ये, फुलवाडी येथील रहिवासी शशिकांत हांडगे यांची अंदाजे ₹40,000 किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल चोरी झाली आहे. ही घटना 18 जुलै रोजी दुपारी 12 ते 12:20 च्या दरम्यान घडली. हांडगे यांनी गिरीजा मेडीकल स्टोअरच्या मागे अणदुर येथे आपली मोटरसायकल लावली होती. तेव्हा अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये, बेरनदीवाडी येथील रहिवासी विजय गोंगाणे यांची अंदाजे ₹21,000 किंमतीची दोन बोकडाची चोरी झाली आहे. ही घटना 19 जुलै रोजी रात्री 1 ते 2 च्या दरम्यान घडली. गोंगाणे यांनी आपल्या उघड्या कोट्यात बोकड बांधून ठेवले होते . रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने ते बोकडा चोरूननेले. . या प्रकरणीही नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.