शिराढोण: घारगाव ( तालुका कळंब ) येथे शिवाजी पंडीत घोरपडे आणि अक्षय शिवाजी घोरपडे यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर शिवाजी साळुंके यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी सायं 7:45 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपींनी फिर्यादी यांच्यावर शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच लोखंडी कत्तीनेही वार केलेचा आरोप आहे.
या मारहाणीमागे काय कारण आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून येते की, फिर्यादी यांनी आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यामुळे त्यांच्यावर राग येऊन त्यांनी हा हल्ला केला असावा.
या प्रकरणी शिवाजी पंडीत घोरपडे आणि अक्षय शिवाजी घोरपडे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 118 (2), 115(2), 352, 351(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.