तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील फोटोग्राफर शिवाजी धुते यांच्या एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून हरवलेल्या आईला तिच्या मुलाशी भेट झाली आहे. पंढरपूर वारीत त्यांनी घेतलेल्या एका फोटो आणि व्हिडिओच्या जोरावर या तरुणाने सोशल मीडियावर या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ पाहून मूळ हैद्राबाद आणि सध्या मुंबईत राहत असलेल्या तरुणाने आपल्या आईला ओळखले.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा पावसात रेनकोट विकताना दिसतो. मुलाच्या मेहनतीचे कौतुक अनेकांनी केले, पण या व्हिडिओमुळे एका तरुणाला दीड वर्षांपूर्वी हरवलेली आई सापडली. मुलगा रेनकोट विकताना सुट्टे पैसे घेण्यासाठी एका महिला विक्रेत्याकडे गेला, तीच त्याची हरवलेली आई होती. शिवाजी धुते यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, आणि या घटनेने लाखो लोकांमध्ये आनंद पसरला आहे.
अनिता कंडूकरी असे या महिलेचे नाव आहे. मुलगा शेखर बरोबर वाद झाल्याने तिने दोन वर्षांपूर्वी घर सोडले होते. त्यानंतर शेखर हा आपल्या आईचा शोध सोशल मीडियावरून घेत होता. त्याला फोटोग्राफर शिवाजी धुते इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ दिसला त्यात त्याची आई होती. त्यानंतर शेखरने धुते यांच्याशी संपर्क काढून आपल्या आईला पंढरपूरला शोधून काढले.
या घटनेने अनेकांच्या मनात भावना दाटून आल्या आहेत सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओला आणि घटनेला कौतुकाचे वाहते आहे. शिवाजी धुते यांनी केलेल्या मानवतेच्या कार्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी QR कोड वापरा