नळदुर्ग: कार्ला येथील एका शेतात फुलांची रोपटी लावण्याच्या कारणावरून एका मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रोहित विकास देवकर आणि विकास उमराव देवकर या दोघांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय उमराव देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 17 जुलै 2024 रोजी त्यांची मुलगी रेश्मा ही शेतात फुलाचे रोपटे लावत असताना नमुद आरोपींनी फुलाचे रोपटे शेतात लावण्याचे कारणावरुन रेश्मा हीस केसाला धरुन गोल फिरवून आपटून गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 1 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय दंड संहिता कलम 117, 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.