धाराशिव – आळणी येथील शिवाजी पंढरी खोबरे (वय 60) यांचा मोटरसायकलला कंटेनरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 13 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास येडशी टोलनाक्याजवळ घडली. या अपघातात त्यांची पत्नी सत्यभामा खोबरे (वय 58) गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताची माहिती देताना, मयत शिवाजी खोबरे यांचे पुत्र सचिन खोबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दोघे आपल्या मोटरसायकलवरून (क्र. एमएच 12 एजे 742) येडशी टोलनाक्याच्या पुढे एनएच 52 रोडवरून जात होते. त्याचवेळी शिवशंभो हॉटेलसमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (क्र. एनएल01 एएफ 4308) त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत शिवाजी खोबरे यांचा जागीच मृत्यू झाला तर सत्यभामा खोबरे गंभीर जखमी झाल्या.
कंटेनर चालक रज्जु घुटटन (रा. चिपराडा, ता. रामगड, जि. अल्वर, राजस्थान) याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 281, 106(1)(2), 125 (ए), 125 (बी) सह मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.