• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 9, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सांगलीतील कंपनीकडून नळदुर्ग परिसरातील १५० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक

गुन्हा दाखल होवून सहा महिने झाले तरी एकाही आरोपींस अटक नाही

admin by admin
August 24, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
सांगलीतील कंपनीकडून नळदुर्ग परिसरातील १५० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नळदुर्ग परिसरातील १५० हून अधिक गुंतवणूकदारांची सांगलीतील ‘भूमी पॉपकॉम लिमिटेड’ कंपनीने तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या पाच जणांविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आजतागायत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आकर्षक व्याजदराच्या आमिषाने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले

या प्रकरणात तक्रारदार शाहेदाबी इक्कारअली सय्यद ( रा.नळदुर्ग ) यांना कंपनीच्या एजंट सुवर्णा शंभुलिंग बोंगरगे ( रा. अणदूर ) यांनी  १३ टक्के अशा आकर्षक व्याजदराच्या आमिषाने ‘भूमी पॉपकॉम लिमिटेड’ कंपनीत पैसे गुंतवणुकीस प्रवृत्त केले होते. या आकर्षक योजनेमुळे सय्यद यांनी केवळ स्वतःच गुंतवणूक केली नाही, तर आपल्या ओळखीच्या अनेक व्यक्तींनाही या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले. सय्यद यांनी २०१२ ते २०१८ या कालावधीत तब्बल ३५.९ लाख रुपये कंपनीत गुंतवले. मात्र, सहा वर्षांच्या गुंतवणुकीनंतर, म्हणजेच परिपक्वतेनंतर कंपनीने पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला.

कंपनीच्या वरिष्ठांकडूनही प्रतिसाद नाही

सय्यद यांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीचे चेअरमन मनोज सुखदेव कदम, प्रविण शंकर मोवाडे आणि धनश्री मनोज कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही आणि नंतर तर फोनच बंद केला. यावरून आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने सय्यद यांनी नळदुर्ग पोलिसांत ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल, पण अटक नाही

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत सुर्वणा शंभूलिंग बोंगरगे, कंपनीचे चेअरमन मनोज सुखदेव कदम, त्यांच्या पत्नी धनश्री मनोज कदम, शिवानंद रींगणे, प्रवीण गल्लाडे या पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासघात) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन सहा महिने उलटून गेले तरीही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.नळदुर्ग पोलिसांनी आरोपीकडून चिरीमिरी घेतल्याची चर्चा सुरु आहे.

गुंतवणूकदार चिंतेत

या घटनेमुळे नळदुर्ग परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपये या कंपनीत अडकले आहेत. त्यांना आपले पैसे परत मिळतील की नाही याची चिंता सतावत आहे.या गुंतवणूकदारांनी आरोपीना अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

Previous Post

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणि बदलापूर घटनेवरून तापलेले राजकीय वातावरण

Next Post

फसवणुकीच्या विळख्यात अडकलेले गुंतवणूकदार आणि निष्क्रिय पोलिस प्रशासन

Next Post
सांगलीतील कंपनीकडून नळदुर्ग परिसरातील १५० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक

फसवणुकीच्या विळख्यात अडकलेले गुंतवणूकदार आणि निष्क्रिय पोलिस प्रशासन

ताज्या बातम्या

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण भाग ३: ‘आमदारांच्या आश्रयानेच ड्रग्ज विक्री’, सामाजिक कार्यकर्त्याचा पोलिसांना स्फोटक जबाब!

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माझ्यावरील गुन्हा घाईघाईने, द्वेष भावनेने दाखल

May 8, 2025
धाराशिव कचरा पुराण: धुराच्या लोळात राजकीय खिचडी!

धाराशिव कचरा पुराण: धुराच्या लोळात राजकीय खिचडी!

May 8, 2025
कौडगावच्या MIDC त ‘टेक्निकल टेक्स्टाईल पार्क’ की ‘टेक्निकली गवताळ पार्क’?

‘लेदर’ गेले, ‘टेक्स्टाईल’ आले… घोषणांचे ‘डिजिटल’ खेळ चालूच राहिले!

May 8, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि लुटीच्या घटनांमध्ये वाढ

May 8, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी परिसरात ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

May 8, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group