बेंबळी – पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवीगाळ व मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. राजुरी येथील रहिवासी दाउद जानुमियॉ शेख (४०) यांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून इकबाल फतरु शेख, शौकत फतरु शेख आणि सिकंदर इकबाल शेख या तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात दाउद शेख गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना ३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:३० वाजता घडली. दाउद शेख यांनी ८ सप्टेंबर रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१)(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दाउद शेख यांना शिवीगाळ करण्यासोबतच काठी व लोखंडी पाईपने मारहाण केली. या हल्ल्यात दाउद शेख यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.