तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ९ सप्टेंबर २०२४ रोजी गोंधळवाडी येथे पेट्रोलिंग दरम्यान धनाजी अभिमान मोटे यास बेकायदेशीरपणे तलवार बाळगताना आढळून आल्याने अटक केली. धाराशिव जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शस्त्र बंदी लागू आहे. मोटे यांच्याकडून जप्त केलेल्या तलवारीसह त्यांच्यावर शस्त्र कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामलवाडी पो.ठा. चे पथक दि. 09.09.2024 रोजी 14.20 वा. सु. तामलवाडी पो.ठा. हद्दीत गोंधळवाडी येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-धनाजी अभिमान मोटे, वय 38 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे विना परवाना स्वत:चे कब्जात एक तलवार बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. सध्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे शस्त्र बंदी आदेश क्र जा. क्र 24/उप चिटणीस/ एम.जी.-3/ कावि-287 दि. 02.09.2024 अन्वये आदेश असताना देखील तलवार बाळगून मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहे. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25, मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.