• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

admin by admin
February 17, 2026
in क्राईम
Reading Time: 2 mins read
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवे मारणाऱ्या आरोपीस धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि २५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दशरथ मुरलिधर सरवदे (वय ३५, रा. जुनोनी, ता. जि. धाराशिव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

मयत फिर्यादी निता शशीकांत विधाते (वय ३५) आणि आरोपी दशरथ यांची ओळख झाल्यानंतर ते काही महिने एकत्र राहिले होते. मात्र, आरोपीने फिर्यादीस त्रास देण्यास सुरुवात केली. दिनांक २६ मार्च २०१७ रोजी रात्री जेवण झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत भांडण केले आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला काडीने पेटवून दिले.

फिर्यादीचा आरडाओरडा ऐकून तिचा मुलगा सुजित याने आईला वाचवण्यासाठी बकेटने पाणी ओतले असता, तेथे उपस्थित असलेल्या आरोपीच्या आई, मावशी आणि आजीने त्याला “तिला विझवू नको, मरु दे,” असे म्हणत मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर जखमी अवस्थेत निता यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

व्हिडिओ रेकॉर्डिंग ठरले महत्त्वाचा पुरावा

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संग्राम उध्दवराव जाधव यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी पीडितेचा जबाब मोबाईल कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूपात नोंदवला होता, जो या खटल्यात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरला. तसेच नायब तहसीलदारांनी नोंदवलेला मृत्यूपूर्व जबाब आणि न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात आरोपीच्या कपड्यांवर आढळलेले रॉकेलचे अंश हे पुरावे ग्राह्य धरण्यात आले.

न्यायालयाचा निकाल

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले आणि जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री डी. देव यांनी आरोपी दशरथ सरवदे याला कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या गुन्ह्यातील इतर तीन महिला आरोपींची (आरोपीची आई, मावशी आणि आजी) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस नाईक पी. एस. तेलप-साठे यांनी काम पाहिले.

महत्वाचे मुद्दे:

  • आरोपी: दशरथ मुरलीधर सरवदे (शिक्षा: जन्मठेप व २५ हजार दंड).

  • न्यायाधीश: श्रीमती अभिश्री डी. देव (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश).

  • सरकारी वकील: ॲड. सचिन एस. सूर्यवंशी.

  • तपास अधिकारी: पो.उ.नि. संग्राम जाधव.

Previous Post

ढोकी पोलीस ठाण्यात मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा

Next Post

हरभरा चोरी अडवल्याने वृद्धावर जीवघेणा हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

हरभरा चोरी अडवल्याने वृद्धावर जीवघेणा हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

October 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भूम ग्रामीण रुग्णालय : इमर्जन्सी रूममध्ये लोखंडी स्टूल फेकून काचा फोडल्या

October 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण

October 11, 2026

Recent Posts

  • धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
  • भूम ग्रामीण रुग्णालय : इमर्जन्सी रूममध्ये लोखंडी स्टूल फेकून काचा फोडल्या
  • धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल
  • शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार
  • उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!