तुळजापूर – हंगरगा शिवारात झालेल्या हिट अँड रन अपघातात 36 वर्षीय विकास अशोक डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोटारसायकलस्वाराने डोंगरे यांना जोरदार धडक दिली आणि मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेची माहिती डोंगरे यांच्या पत्नी विजयमाला यांनी 12 सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात मोटारसायकलस्वाराविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मयत नामे-विकास अशोक डोंगरे, वय 36 वर्षे, रा. बिजनवाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव हे हंगरगा शिवारातील हॉटेल जानकी समोर उभा होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 9403 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून विकास डोंगरे यांना धडक दिली. तसेच नमुद मोटरसायकल चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात घेवून न जाता मोटरसायकलसह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजयमाला विकास डोंगरे, वय 35 वर्षे, रा. बिजनवाडी ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.12.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1)(2), 125(ब) सह मोवाका कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.