नळदुर्ग – मागील काही महिन्या पासून नळदुर्ग शहरात काही भुरट्या तर काही मोठ्या चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली असून या मध्ये भंगार गोळा करणाऱ्या महिलाचा आधार घेऊन चोऱ्या करणारी टोळी सक्रिय झाली असल्याची माहिती समोर येत आहे.याकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
या बाबत समजलेल्या माहिती नुसार नळदुर्ग शहरात मागील काही महिन्या पासून भुरट्या चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांचा ससेमीरा मागे नको म्हणून अनेकांनी या किरकोळ चोरीच्या तक्रारी पोलिसांत केल्या नाहीत. परिणामी चोऱ्या करणाऱ्यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.
या टोळीतील महिला या भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने गल्ली बोळात, राणावनात फिरत असतात. भंगार गोळा करणाऱ्या महिला म्हणून आपणही त्या कडे दुर्लक्ष करित असतो.. त्याचाच फायदा घेत या महिला उघड्यावर पडलेले साहित्य आजूबाजूचा कानोसा घेऊन उचलून घेऊन जात असल्याची माहिती समोर येत आहे तर रात्रीच्या वेळी अनेक शेतकऱ्याच्या पाण्याच्या मोटारी, किंवा त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायरच्या चोऱ्या होण्याच्या घटनेत ही वाढ झाल्याचे शेतकऱ्याच्या तक्रारी आहेत.
या टोळीच्या मागे अदृश्य व्यक्तीचे लागे बांधे असावेत असा कयास व्यक्त केला जात आहे..भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने कोणी आपल्या आजू बाजूस फिरत असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवून आपल्या भागात चोरीच्या घटना रोखण्यासाठी आता नागरिकांनीच दक्ष राहण्याची गरज आहे…