धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कारभारी, म्हणजेच मोठे साहेब, सध्या एका अनोख्या बोगस नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राच्या गोष्टीमुळे फेमस झाले आहेत. बाळासाहेब सुभेदार नावाच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने या प्रकरणाचा धडाका लावला आहे. सुभेदार रोज काही ना काही माहिती जाहीर करत आहेत, आणि आता त्यांनी राज्यपालांपर्यंत जाऊन साहेबावर कारवाईची मागणी केली आहे.
सुभेदारांनी चक्क ओपन चॅलेंज दिलंय – “माझी तक्रार खोटी असेल तर मला फाशी द्या, पण खरी असेल तर साहेबांना बडतर्फ करा!” म्हणजे थोडक्यात, साहेबांचे पाय जमिनीवर नसले तरी डोके मात्र ढगात आहे!
या प्रकरणामुळे अधिकारी – कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी साहेबाकडे गेले होते. सोबत “चमच्याचे” बिरुद मिरवणारे दोन पत्रकारदेखील होते. साहेब विचारात पडले, “सुभेदारांवर खंडणीची केस दाखल करायची का?” पण तेवढ्यात सगळे एकमेकांकडे पाहू लागले. कारण सुभेदारांनी पैसे कुणाला मागितलेच नव्हते, ते कसे ब्लॅकमेलर ठरतील?
साहेबांनी अखेर ठरवलं की, “कोणाचं अंगावर घेण्याचं धाडस असेल, तर पुढं येवून सांगावं!” पण पाण्यात राहून माश्याशी वैर कोण करतं? साहेबांची हेगडी चालूच आहे, पण आता धाराशिवच्या वाऱ्याला बोगस प्रमाणपत्राचा नवा गंध आहे!
तर सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे – हे प्रकरण अजून किती दिवस फळणार आणि साहेबांचे पुढचे पाऊल काय असणार? धाराशिव जिल्ह्यात जरी साहेब असले तरी सुभेदारांनी त्यांना पुरतं अडकवून ठेवलंय!