तुळजापूर: तुळजापूर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याची नोंद तुळजापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पहिल्या घटनेत, विजापूर येथील आकाश राठोड हे ११ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले असताना एका अज्ञात महिलेने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड आणि २,५०० रुपये रोख रक्कम चोरून पळ काढला.
दुसऱ्या घटनेत, उमरगा येथील तोलन दणाने हे ६ ऑक्टोबर रोजी नवीन बसस्थानकावरून उमरगा येथे जाण्यासाठी बस पकडत असताना एका अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील १,१२,६४६ रुपये किमतीची सोन्याची मिनी गंठण चोरून नेली.
दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.