महाराष्ट्रातील निवडणुकीचा धुमाकूळ सुरू होण्याच्या तयारीत आहे. दोनच दिवसांत निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, आणि सगळे राजकीय नेते दौरे करत आहेत, पण सगळ्यांच्या नजरा फक्त दोनच लोकांवर – देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यावर!
२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता, पण शरद पवार यांनी त्या नार्याला ‘अच्छा! असं आहे का?’ असं म्हणून त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. शिवसेनेला आपल्या जाळ्यात ओढून महाविकास आघाडी तयार केली आणि देवेंद्रजींना राजकीय शाळेत परत बसवलं.
पण फडणवीसही काही कमी नाहीत! त्यांनी तंगडं टाकली आणि पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसले. फक्त तेवढंच नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही फोडून हिशोब चुकता केला. आता पुन्हा फोडाफोडीचा खेळ सुरू झालाय, आणि शरद पवार ८५ वर्षांचे असूनही महाराष्ट्रभर फिरत आहेत, पायाला फिंगरी बांधूनच मेळावे घेत आहेत.
फलटणमध्ये त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्या जाळ्यात ओढलं आणि नारा दिला, “८५ काय, ९० वर्षांचा होईन तरी हा म्हातारा स्वस्थ बसणार नाही.” खरंच, महाराष्ट्राने असा धूर्त राजकारणी कधीच पाहिलेला नाही.
तर आता महाराष्ट्रातील जनता उत्सुकतेने पाहत आहे – फडणवीस-पवारांच्या या राजकीय कुस्तीचा पुढचा राऊंड कोण जिंकणार? हे म्हातारे थांबणार आहेत की पुन्हा एकदा नव्या फोडाफोडीचे पत्ते खेळणार आहेत?