धाराशिव – आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या निष्क्रिय कारभारामुळे मटका , जुगार , अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे, तसेच पान टपरीवर राजरोस गुटखा विक्री सुरु असताना, बांगर हे थंडगार बसले आहेत.
धाराशिव शहरात दोन पोलीस स्टेशन आहेत. बसस्थानकापासून शिंगोलीपर्यंत आनंदनगर पोलीस स्टेशनचा भाग येतो. या भागात राजरोस मटका सुरु आहे. पान टपरीवर गुटखा विक्री बरोबर मटका घेणे सुरु असताना, पोलिसांचा कानाडोळा होत आहे. गावठी दारू विक्री सुरु आहे.
शहरात एस. एच. हा मुख्य मटका बुक्की धारक आहे. त्याच्या आनंदनगर भागातील घरातूनच मटक्याची सर्व सूत्रे हालत आहेत. या एस. एच चा पोलिसांना दरमहा हप्ता असल्याने कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच यापूर्वी या मटका बुक्की चालकावर अनेक गुन्हे असताना, त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धाराशिव बायपासवरील काही लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असतानाही त्याकडे जाणीपूर्वक कारवाई केली जात नाही. गुटखा तर राजरोस विकला जात आहे.
फरार आरोपीना पोलिसांचे अभय
धाराशिव नगर पालिका घोटाळ्यातील आरोपी तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे , तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक प्रशांत विक्रम पवार यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून ५० दिवस झाले तरी पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर त्यांना अटक करण्यात निष्क्रिय ठरले आहेत. २७ कोटींचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग न करता, स्वतःकडे तपास ठेवून बांगर यांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतल्याची चर्चा सुरू आहे.