तुळजापूर – महाराष्ट्रभरातील भाविकांसाठी तुळजाभवानी मातेचं मंदिर म्हणजे श्रद्धेचं स्थान. मात्र सध्या तुळजापूरमध्ये देवीपेक्षा चोरांचंच दर्शन घडतंय, असा अनुभव भाविकांना येतोय. चोरांनी इतकी मेहनत घेतलीये की, ते भाविकांच्या अंगावरील सोन्याचं दर्शन घेण्यासाठी अगदी उत्साहाने आलेत. अशा परिस्थितीत, मंदिरात देवीच्या दर्शनाला आलेले भाविक भाविकांच्या ऐवजी चोरांच्या हाती लागलेत!
तुळजापूरचं चोरट्यांचं साम्राज्य इतकं पसरलयं की, सामान्य महिलांचं सोडाच, आता पोलिसांवरही त्यांनी धाडसी हल्ला केला आहे. सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला पोलीस शिपाई, गदेवी पूजारी (वय 34) यांनी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये हजेरी लावली. पण देवीचं दर्शन घेण्याआधीच चोरांनी त्यांच्यावर डोळा ठेवला. त्यांच्या सोबत असलेल्या 63 वर्षीय उषा वारकरी यांचं 2 लाख 48 हजारांहून अधिक किंमतीचं दोन सोन्याचं गंठण चोरट्यांनी उचललं. असं वाटावं की, चोरांनी देवीचं नव्हे तर सोन्याचं “अभिषेक” केल्यासारखं!
गुन्हा दाखल झालेल्या अहवालानुसार, फिर्यादी गदेवी पूजारी (वय 34, सोलापूर जिल्हा कारागृहातील पोलीस शिपाई) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासोबत असलेल्या उषा उदयराव वारकरी (वय 63) या महिलेकडून दोन सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले आहेत. एक गंठण अंदाजे 115,000 रुपये किंमतीचे असून, दुसरे 133,244 रुपये किमतीचे आहे. चोरी झालेल्या या दोन गंठणांची एकूण किंमत सुमारे 2,48,244 रुपये आहे.
घटना अगदी सुक्ष्म पद्धतीने पार पडली, ना कोणता गोंधळ, ना कोणतं शस्त्र! बिचारे भाविकांनी अजून देवीचं दर्शन घेतलं नव्हतं, तोपर्यंत चोरांनी त्यांचं “गंठण दर्शन” उरकलं. भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचा काय फायदा, असा विचार आता भाविक करू लागले आहेत. चोरांच्या धाडसापुढे पोलिसांची निष्क्रियता अशी आहे की, आता भाविकच पोलिसांना शिकवू लागले आहेत की कसं काम करायचं!
“तुळजापूरमध्ये सोनं घेऊन आलात तर, देवीच्या नाही तर चोरांच्या हाती सोनं देऊन जाल” असं म्हणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुळजापूरच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे आणि तपास सुरू केलाय. तपासाचा पदर हवालदार लोखंडे यांच्या हाती आहे, पण चोरट्यांचं सोनेरी साम्राज्य अजूनही अभेद्य आहे.
भाविकांनी आता तुळजाभवानीच्या दर्शनाला जाण्याआधी गळ्यातील सोनं घालायचं की काढायचं, याचा विचार करायला हवा! मंदिराचं दर्शन घेण्याआधी चोरट्यांचं दर्शन घडणं ही तुळजापूरच्या भाविकांची रोजची व्यथा बनली आहे. त्यामुळे, या चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी मात्र ‘कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित आहे’ अशी गोड बातमी दिली आहे.
तुळजापूरमध्ये चोरटे दिवसेंदिवस इतके निर्ढावले आहेत की, “सोनं चोरून देवीच्या पायाशी अर्पण करणार का?” असं विचारावं असं वाटतंय. भाविकांपेक्षा चोरांमध्येच देवाच्या दर्शनासाठी अधिक उत्साह असल्याचं चित्र आहे. चोरट्यांची कुशलता अशी की, सोनं काढून नेतात आणि भाविकांना त्यांचीच किंमत कळत नाही!
तुळजापूरच्या चोरांनी इतकं धाडस केलं आहे की, भाविकांनी आता सोनेरी “सेफ्टी” घेऊनच तुळजापूर दर्शनाचा प्लॅन करावा. चोरीचं दर्शन अगदी नकळतच होतं, पण आता पोलिसांनी चोरी करणाऱ्या या कुशल चोरट्यांना कधी पकडणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.