• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र धाराशिव दौऱ्यावर; लाचखोर आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

admin by admin
March 10, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?
0
SHARES
720
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव/तुळजापूर: तुळजापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे माहेरघर बनलेल्या तुळजापूर पोलीस ठाण्याचे ‘निष्क्रिय’ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र हे आज (१० मार्च २०२६) सकाळी धाराशिव पोलीस मुख्यालयात वार्षिक तपासणीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या या तीन दिवसीय दौऱ्यात पीआय मांजरे यांची जोरदार कानउघाडणी होणार असून त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.


पोलिस ठाण्याच्या आवारातच लाचखोरीचा बाजार

तुळजापूर पोलीस ठाण्यात खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना नुकतीच (४ मार्च) घडली. एका दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी, कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल जप्त न करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) श्रीनिवास रामदास आरदवाड (वय ४८) याला ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पोलीस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडले.

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, ही लाच थेट पीआय अण्णासाहेब मांजरे यांच्या सांगण्यावरूनच स्वीकारण्यात आल्याची खळबळजनक चर्चा पोलीस वर्तुळात आणि शहरात सुरू आहे.

तुळजापुरात गुन्हेगारीचा सुळसुळाट

पोलीस निरीक्षक मांजरे यांच्या आशीर्वादाने तुळजापूर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे:

  • गोळीबाराच्या घटना: गेल्या अवघ्या तीन महिन्यांत शहरात तब्बल तीन वेळा हवेत गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

  • अवैध धंद्यांना मोकळे रान: शहरात दारू, मटका, जुगार आणि वेश्याव्यवसाय राजरोसपणे आणि तेजीत सुरू आहे.

  • महिलांचा संताप: या बिघडलेल्या परिस्थितीला कंटाळून अखेर भाजप नगरसेविका प्रियंका गंगणे यांनी महिलांना सोबत घेत पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात थेट निवेदन दिले आहे.

वरिष्ठ कारवाई करणार का?

राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या स्पष्ट निर्देशानुसार, कोणत्याही पोलीस ठाण्यात लाचखोरीचे प्रकरण घडल्यास त्याला थेट संबंधित पोलीस ठाण्याचे ‘प्रभारी अधिकारी’ जबाबदार धरले जातात. आता खुद्द पोलीस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडल्याने, पोलीस अधीक्षक रितू खोखर या पीआय अण्णासाहेब मांजरे यांच्यावर कोणती कठोर कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्याला डीवायएसपी (DySP) पदाची बढती?

अण्णासाहेब मांजरे यांचा वादग्रस्त इतिहास नवा नाही. यापूर्वी ते सातारा आणि बार्शी येथे कार्यरत असतानाही त्यांच्या हाताखालचे पोलीस कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. जिथे मांजरे, तिथे लाचखोरी, असे जणू समीकरणच बनले आहे.

असे असतानाही, एवढा काळा इतिहास असलेले मांजरे सध्या ‘पोलीस उपाधीक्षक’ (DySP) पदी पदोन्नती मिळवण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावत असल्याची माहिती समोर आली आहे. एका भ्रष्ट आणि निष्क्रिय अधिकाऱ्याला थेट बढतीचे बक्षीस दिले जाणार का? असा संतप्त सवाल आता तुळजापूरची जनता विचारत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या दौऱ्यानंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.


Previous Post

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे; सरकारच्या कर्ज मर्यादेवर आमदार कैलास पाटील यांचा इशारा

Next Post

टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Next Post
टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!