बेंबळी – रुईभर येथे मोटरसायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर शिवाजी निंबाळकर (वय २४, रा. रुईभर) यांना प्रतिक भागवत पडवळ, प्रणिता भागवत पडवळ आणि भागवत भिमराव पडवळ (तिघे रा. रुईभर) यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगड आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना २८ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता भोईटे सभागृहासमोर घडली. ज्ञानेश्वर निंबाळकर यांनी १ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
माहिती अधिकार टाकल्याच्या कारणावरून मारहाण
येरमाळा – माहिती अधिकार अर्ज दाखल केल्याच्या रागातून दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना शिंगोली येथे घडली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार रामचंद्र मते (वय ३७, रा. शिंगोली) यांना रविंद्र दौलतराव माने आणि सर्जेराव कुंडलीक माने (दोघे रा. शिंगोली) यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई व दगडाने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या कडेला घडली. राजकुमार मते यांनी १ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शेत वाटणीच्या वादातून मारहाण, लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोहारा – शेत वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंडजीगड येथे घडली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता गणपती बिराजदार (वय ४७, रा. कोंडजीगड) यांना संजय गणपती बिराजदार, संदीप संजय बिराजदार आणि गोपाळ बबन जाधव (सर्व रा. कोंडजीगड) या तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना १ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता घडली. दत्ता बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३३३, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.