उमरगा-लोहारा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोमवारी, ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी उलथापालथ झाली. २८ उमेदवारांपैकी १८ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात निवडणुकीच्या प्रारंभापासूनच मोठी उत्सुकता होती.
प्रारंभी १२२ जणांनी नामनिर्देशन पत्र घेतले होते, त्यापैकी ४३ नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. छाननीनंतर २८ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले गेले होते. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना (उबाठा) गटातील बंडखोरी वाढली असतानाही महायुतीचे दिग्विजय शिंदे आणि कैलास शिंदे यांनी अखेरीस आपली उमेदवारी मागे घेतली.
उमेदवारांची यादी: शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले, शिवसेना (उबाठा) चे प्रविण स्वामी, बहुजन समाज पक्षाच्या सुनंदा रसाळ, वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड, मराठवाडा मुक्ती मोर्चाचे शिवप्रसाद काजळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सातलिंग स्वामी आणि आरपीआय (ए) चे संदीप कटबु हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचबरोबर तीन अपक्ष उमेदवार उमाजी गायकवाड, अजय देढे आणि श्रीरंग सरवदे हेही आपले नशीब अजमावीत आहेत.
माघार घेणाऱ्या उमेदवारांची यादी: कैलास शिंदे, दिग्विजय शिंदे, गुरुबसय्या स्वामी, विजय वाघमारे, श्रीमंत सुरवसे, दिलीप गायकवाड, उमेश सुरवसे, दत्तू हिराळे, सचिन माने, विलास व्हटकर, संजय कांबळे, बालाजी कोणाळे, पांडुरंग पोळे, प्रभाकर कवाळे, प्रशांत काळे, अशोक सरवदे, वीरूपक्ष स्वामी आणि वामन पंडागळे