• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरच्या विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची महत्त्वाकांक्षी योजना

admin by admin
November 10, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजापूरच्या विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची महत्त्वाकांक्षी योजना
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा कायापालट करून जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हे आपले ध्येय आहे, असे महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी आयोजित आशीर्वाद यात्रेत सांगितले. मागील पाच वर्षांत तुळजापूर मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देत पाटील यांनी, पुढील काळात दोन हजार कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ तुळजापूर शहरात भव्य आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी नागरिकांनी राणा पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादनाने यात्रेला सुरुवात झाली. भवानी रोड, महाद्वार रोड, कमान वेस गल्ली मार्गे तुळजाभवानी मंदिरापर्यंत ही आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. यात्रेनंतर आयोजित सभेत पाटील यांनी विकासकामांची माहिती दिली.

“आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आम्ही या प्रचाराला सुरुवात केली आहे, आणि आमचा अजेंडा एकच आहे – विकास, विकास आणि फक्त विकास,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असून स्थानिक व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे. पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना सांगितले की, त्यांनी रेल्वे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला नव्हता, परंतु महायुती सरकारने ४५० कोटींचा निधी मंजूर करून रेल्वेमार्गाचे काम सुरू केले आहे.

महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफीसह मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, महिलांसाठी दर महिन्याला दीड हजार रुपयांची योजना सुरु केली आहे, असे सांगून पाटील यांनी विकासाच्या आगामी योजनांची माहिती दिली.

Previous Post

तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला आलेल्या सोलापूरच्या महिलेचे मंगळसूत्र चोरी

Next Post

तुळजापूर मतदारसंघ : मधुकरराव चव्हाण , अशोक जगदाळे शांत ! भूमिका अस्पष्ट !!

Next Post
तुळजापूर मतदारसंघ : मधुकरराव चव्हाण , अशोक जगदाळे शांत ! भूमिका अस्पष्ट !!

तुळजापूर मतदारसंघ : मधुकरराव चव्हाण , अशोक जगदाळे शांत ! भूमिका अस्पष्ट !!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!