• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, May 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

विधानसभा निवडणूक: उद्या मतदान; धाराशिव जिल्ह्यात चुरशीच्या लढतींना रंग

admin by admin
November 19, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
विधानसभा निवडणूक : जिल्ह्यात ९९ इच्छूक उमेदवारांची २१४ अर्जांची खरेदी
0
SHARES
368
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांसाठी उद्या, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण ६६ उमेदवार रिंगणात असून, चारही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या आहेत. मतदारसंघवार उमेदवार आणि लढतींचा आढावा पुढीलप्रमाणे आहे:

धाराशिव मतदारसंघ: शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट सामना
धाराशिव मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आ. कैलास पाटील आणि शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यात होत आहे. पिंगळे यांना कळंब तालुक्यात मजबूत आधार असून, आ. पाटील यांना धाराशिव शहर आणि तालुक्यातील ४३ गावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आ. कैलास पाटील यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र आहे.

तुळजापूर मतदारसंघ: भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष
तुळजापूर मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील यांच्यात होत आहे. समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे, आणि प्रहार जनशक्तीचे अण्णासाहेब दराडे यांनीही जोरदार प्रचार केला आहे. मात्र, मतविभागणीमुळे आ. राणा पाटील यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परंडा मतदारसंघ: सावंत यांची परीक्षा; चुरशीची लढत
परंडा मतदारसंघात २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मुख्य लढत शिवसेना शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार राहुल मोटे यांच्यात आहे. परंडा हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असला तरी यावेळी ते डेंजर झोनमध्ये असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने जाईल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उमरगा मतदारसंघ: चौगुले यांचा चौकार हुकणार ?
उमरगा मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असून, मुख्य लढत शिवसेना शिंदे गटाचे आ. ज्ञानराज चौगुले आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी यांच्यात आहे.  मागील तिन्ही निवडणुका जिंकून हॅट्ट्रिक मारणाऱ्या आ. चौगुले यांची यंदा डेंजर झोनमध्ये गणना होत आहे. ते चौकार मारतील का पराभव पत्करतील, हे उद्याच्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.

मतदान आणि निकालाकडे लक्ष
धाराशिव जिल्ह्यातील ४ मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत असून, उमेदवारांनी अखेरच्या क्षणी प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. उद्या होणाऱ्या मतदानातून कोण बाजी मारेल आणि कोणाचे राजकीय समीकरण बिघडेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी आहे.

Previous Post

आचारसंहिता भंग प्रकरण: काँग्रेसचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५८.५९ टक्के मतदान

Next Post
धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५८.५९ टक्के मतदान

धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५८.५९ टक्के मतदान

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात अवैध दारू अड्यांवर पोलिसांचे छापे; ५० लिटर गावठी मद्यासह दोघींना अटक, करजखेड्यात देशी दारू जप्त

May 31, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात जुगार अड्यांवर पोलिसांचा ‘हल्लाबोल’; हॉटेल, बाजारपेठेसह शेतात छापे; १२ जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

May 31, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात हॉटेल छत्रपतीसमोर थरार! बेकायदेशीर ‘एअर रायफल’ आणि तलवारीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात; घातक शस्त्रे जप्त

May 31, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई! बसस्थानक, पानटपऱ्यांसह ग्रामपंचायत परिसरातील ६ अड्यांवर छापे; प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त

May 31, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट! तुळजापुरात महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटले; भूममध्ये बाईकच्या डिग्गीतून ४ लाख लंपास

May 31, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group