• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी

३ डिसेंबर रोजी पहाटे 'श्री' चे नळदुर्गमध्ये आगमन

admin by admin
November 24, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी
0
SHARES
714
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

 तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा येत्या २ डिसेंबर (सोमवार) रोजी मोठ्या उत्साहात भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची जय्यत सुरु आहे.

सकाळी ९.३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा, खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रींची छबीना – मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकऱ्याचे आगमन होईल व त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) च्या मानकऱ्यात खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. ३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन होईल व नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.

यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

३ डिसेंबर रोजी पहाटे ‘श्री’ चे नळदुर्गमध्ये आगमन

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८ प्रमुख ठिकाणे आहेत. पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) हे महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग  येथे झाला होता. अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी पहाटे ‘श्री’ चे नळदुर्गमध्ये आगमन होणार आहे.

Previous Post

आरळीत शेतात जाण्याच्या कारणावरून मारहाण

Next Post

धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन आमदार मंत्रीपदासाठी दावेदार

Next Post
धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन आमदार मंत्रीपदासाठी दावेदार

धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन आमदार मंत्रीपदासाठी दावेदार

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव: आर्थिक तडजोड करून गाडी सोडल्याचा आरोप; पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन संशयास्पद असल्याचा अहवाल, मात्र अद्याप कारवाई नाही!

March 18, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक; धाराशिव पोलिसांची कारवाई, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

March 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूममध्ये बंद घर फोडले; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 18, 2026
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमाचीवाडीत ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

March 18, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शासकीय कामात अडथळा; पवनचक्कीच्या कामगारांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

March 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group