येरमाळा – कळंब तालुक्यातील राळे सांगवी येथे एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अर्चना उर्फ सोनाली दिलीप जाधव (वय 25) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना हिच्या पतीने, दिलीप सोमनाथ जाधव याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मागील एक वर्षापासून तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अर्चना हिने 30 नोव्हेंबर 2024 रोजी राळे सांगवी येथील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत अर्चनाच्या आईने, फुलाबाई अभिमान पवार (वय 42, रा. अर्जुन नगर, पो. फिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती दिलीप जाधव याच्या विरोधात भादंवि कलम 108, 85 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.