• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारी गाडी जप्त; वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

admin by admin
February 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
300
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून अत्यंत निर्दयीपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत जनावरे आणि वाहनासह एकूण ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०.१० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पारा ते फकराबाद या मार्गावर एका संशयित वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून या वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला.

चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर पोलिसांनी वाहनाची पाहणी केली. त्यावेळी वाहनात गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयीपणे कोंबलेली आढळून आली. या मुक्या जनावरांना गाडीमध्ये साधी हालचाल करण्यासाठीही पुरेशी जागा नव्हती. ही जनावरे कोठून आणि कशासाठी आणली आहेत, याबाबत चालकाकडे चौकशी केली असता, त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.

पोलिसांनी तात्काळ हे वाहन वाशी पोलीस ठाण्यात आणले. दोन पंचांसमक्ष वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यात ४ गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी वाहन व जनावरे असा एकूण ८,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात (गुन्हा नोंदणी क्रमांक ५४/२०२६) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (D) (E) (H) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ) (१), ९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस ठाण्याचे हवालदार बळीराम यादव करत आहेत.

सदरची धडक कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस अंमलदार पुष्कर मुगळे, सुभाष चौरे आणि वाशी पोलीस स्टेशनचे हवालदार बळीराम यादव यांचा सहभाग होता.

Previous Post

कनगरा येथे घरफोडी:  दरवाजाचे कुलूप तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास; बेंबळी पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

Next Post
शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!