धाराशिव: धाराशिव शहरातील हॉटेल मुस्कानजवळ एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना १५ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली.
रोहीत जाधव नावाच्या आरोपीने सौरभ लोखंडे (वय २१) आणि वैभव शाम पवार या दोघांना “अजित चव्हाणसोबत का फिरता?” अशी विचारणा करत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात सौरभ लोखंडे गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी सौरभ लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपी रोहीत जाधव विरुद्ध भादंवि कलम ११८ (१), ११८ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.