वाशी – झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना १९ डिसेंबर रोजी लिंग्गी पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय सुरेश तावरे (वय २४, रा. लिंग्गी पिंपळगाव) हे १९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता लिंग्गी पिंपळगाव येथे झाडे तोडत होते. त्यावेळी रावसाहेब त्रिबंक तावरे आणि साखरबाई त्रिबंक तावरे (दोघेही रा. लिंग्गी पिंपळगाव) यांनी त्यांना झाडे तोडण्यावरून आक्षेप घेतला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी अभय तावरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगड आणि काठीने मारहाण केली.
यावेळी अभय तावरे यांच्या आई आणि चुलत बहिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर अभय तावरे यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रावसाहेब तावरे आणि साखरबाई तावरे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.