धाराशिव – येथील संभाजी नगर येथे एका तरुणाला व त्याच्या आईला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकेत सुशिलकुमार सरवदे (वय २३) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेंद्र महादेव रणदिवे, संगीता सुरेंद्र रणदिवे, विमल महादेव रणदिवे आणि अभिजीत रामलिंग रणदिवे यांनी २३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री साडेआठ वाजता त्याला व त्याच्या आईला फोनवरून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), ३५१(४), ३३३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.