धाराशिव: धाराशिव शहरातील खाजा नगर भागात गल्ली नंबर १३ मदिना मस्जिद समोर रस्त्यावरच मंगळवारी रात्री दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका मित्राचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.
मयत तरुणाचे नाव परवेज दगडू बेग ( वय ४०) असून तो गल्ली नंबर ७, खाजा नगर, धाराशिव येथे राहत होता. जखमी तरुणाचे नाव कुमार काशिनाथ गोरे (वय ४०) असून तो तांबरी विभाग, धाराशिव येथे राहतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम अहमद शेख या तरुणाने परवेज दगडू बेग याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात परवेजचा जागीच मृत्यू झाला. कुमार गोरे याला किरकोळ दुखापत झाली आहे.
मयत परवेज आणि आरोपी अक्रम हे मित्र होते. संशयावरून हा खून झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी परिसरातील लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
Video