तुळजापूर – श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज, ७ जानेवारी रोजी, घटस्थापनेने सुरुवात झाली. सकाळी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपारी १२ वाजता घटस्थापना करण्यात आली.
छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नवरात्रोत्सवात १४ जानेवारीपर्यंत दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री देवीचा विविध वाहनांवर छबिना काढला जाणार आहे.
पुढील आठवड्यातील कार्यक्रम:
- ८ जानेवारी: नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबिना.
- ९ जानेवारी: नित्योपचार पूजा, मुरली अलंकार महापूजा व रात्री छबिना.
- १० जानेवारी: नित्योपचार पूजा, शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना.
- ११ जानेवारी: सकाळी जलयात्रा, भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबिना.
- १२ जानेवारी: अग्नी स्थापना, शतचंडी होमहवनास सुरुवात, नित्योपचार पूजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा व रात्री छबिना.
- १३ जानेवारी: शाकंबरी पौर्णिमा, नित्योपचार पूजा, दुपारी १२ वाजता पूर्णाहुती, घटस्थापन, रात्री छबिना व जोगवा.
- १४ जानेवारी: नित्योपचार पूजा, दुपारी अन्नदान, महाप्रसाद, रात्री छबिना (मकरसंक्रांत), रात्री संक्रांत पंचांग श्रवण/वाचन.
शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच या शाकंभरी नवरात्रोत्सव काळात सर्व धार्मिक विधी आणि महापूजा करण्यात येणार आहेत.