• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा येथील सराफ व्यावसायिक लूट प्रकरण: स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघे गजाआड, सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
July 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
परंडा येथील सराफ व्यावसायिक लूट प्रकरण: स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघे गजाआड, सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा: येथील एका सराफ व्यावसायिकाला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सोलापूर आणि परंडा परिसरातून या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण १,९७,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संतोष विनायक गुंजाळ (वय ४०, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर), सर्जेराव सखाराम डिकोळे (वय ४६, रा. लव्हळ, ता. माढा, जि. सोलापूर) आणि राजू सिध्दू शिंदे (वय ४०, रा. परंडा, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा तपास करत होते. परंडा पोलीस ठाण्यात गुरंन १८८/२०२५ नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सोलापूर जिल्ह्यातील बारलोणी येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे, पथकाने बारलोणी येथे सापळा रचून संतोष गुंजाळ याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या इतर पाच साथीदारांची माहिती दिली.

गुंजाळच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी परंडा येथील समता नगर झोपडपट्टी परिसरातून राजू शिंदे याला ताब्यात घेतले. त्यानेही गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी सर्जेराव डिकोळे यालाही अटक केली.

या तिन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल, लुटलेले सोन्याचे दागिने आणि २३,५०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १,९७,६७० रुपये आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी परंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

तुळजापूर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; दोन मोटारसायकली आणि पानबुडी लंपास

Next Post

चारित्र्याच्या संशयातून खून: उमरगा पोलिसांनी प्रियकराला २४ तासांत पुण्यामधून ठोकल्या बेड्या

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

चारित्र्याच्या संशयातून खून: उमरगा पोलिसांनी प्रियकराला २४ तासांत पुण्यामधून ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

July 27, 2026
होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

July 27, 2026
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

July 27, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

July 27, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!