धाराशिव: रामनगर येथील कबीर बाबु सय्यद (वय ५५) यांना शेताच्या बांधावर राजु विठ्ठल बळी, बालु गवळी (दोघेही रा. रामनगर) व इतर दोघांनी तंबाखू मागण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व हातातील कड्यांनी मारहाण केल्याची घटना २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली.
आरोपी नामे-राजु विठ्ठल बळी, बालु गवळी दोघे रा. रामनगर व इतर दोन इसम यांनी दि.22.01.2025 रोजी 17.30 वा. सु. सांजा शिवार घोणे यांचे शेताचे बांधावर फिर्यादी नामे-कबीर बाबु सय्यद, वय 55 वर्षे, रा.रामनगर सांजा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तंबाखु मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,हातातील कड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कबीर सय्यद यांनी दि.22.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणी सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.