परंडा: नालगाव येथील ६० वर्षीय कैलास गजेंद्र करळे यांना संतोष गजेंद्र करळे यांनी शेतात जाण्यावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने व उसाने मारहाण केल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली.
नालगाव शिवारातील गट नंबर ३२९ मध्ये कैलास करळे हे शेतात गेले असताना संतोष करळे यांनी त्यांना शेतात येण्याचे कारण विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून काठी व ऊस यांनीही मारहाण केली. या मारहाणीत कैलास करळे जखमी झाले असून संतोष करळे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या घटनेची तक्रार कैलास करळे यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी संतोष करळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नालगावात शेताच्या वादातून मारहाण
परंडा: नालगाव येथील ६४ वर्षीय संतोष गजेंद्र करळे यांना कैलास गजेंद्र करळे आणि आशा कैलास करळे यांनी शेतात येण्यावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली.
नालगाव शिवारातील गट नंबर ३३० मध्ये संतोष करळे हे शेतात गेले असताना कैलास करळे आणि आशा करळे यांनी त्यांना शेतात येण्याचे कारण विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून काठी व कोयता यांनीही मारहाण केली. या मारहाणीत संतोष करळे जखमी झाले असून कैलास आणि आशा करळे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या घटनेची तक्रार संतोष करळे यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी कैलास आणि आशा करळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.