बेंबळी: बेंबळी ते धाराशिव रस्त्यावर रुईभर गावाजवळील पवनचक्कीच्या प्लॉटजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव शाम दगडु शेळके (वय 32 वर्षे, रा. बोरगाव राजे) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम शेळके हे रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने बेंबळीकडून धाराशिवकडे जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला एमएच 25 ए.एस. 4951 क्रमांकाची कार पार्किंग लाईट न लावता उभी होती. अंधारात कार दिसली नसल्याने शेळके यांची मोटारसायकल कारला जोरात धडकली. या अपघातात शेळके हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मृताचे वडील दगडु आप्पाराव शेळके (वय 70 वर्षे) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालकाने हयगयी आणि निष्काळजीपणे कार पार्क केल्यामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भादंवि कलम 285, 125(ब), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.