धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो म्हणून अणदूरसह अनेक तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी नळदुर्ग पोलिसांचा ‘तपास’ अजूनही सुरूच आहे!
तक्रार दाखल होऊन आज एक महिना पूर्ण झाला, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी “आम्ही तपास करत आहोत” हा जप सुरूच ठेवला आहे.
गुन्हा आधी की तपास आधी?
- साधारणतः कुठल्याही फसवणुकीच्या प्रकरणात आधी गुन्हा दाखल करून मग तपास केला जातो.
- पण नळदुर्ग पोलिसांचा कार्यप्रणाली वेगळी दिसते – ते तपास पूर्ण करून मग गुन्हा दाखल करणार म्हणत आहेत.
- आता प्रश्न असा की हे कायदेशीर गोंधळ आहेत की कोणाचा दबाव?
पोलीस दबावाखाली आहेत की चिरीमिरीचा प्रभाव?
- वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला का?
- मोठ्या साहेबाच्या आशीर्वादाने गंडा घालणाऱ्या दलालाला कोणाचे संरक्षण आहे?
- की मग चिरीमिरी घेऊन पोलिसांनी तपासाला ब्रेक लावला?
न्याय मिळेल की “तपास सुरूच” राहणार?
फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलीस ठाण्यात पुराव्यासह तक्रार दिली, तरीही गुन्हा दाखल होत नाही, म्हणजे काहीतरी खेळ मोठा दिसतोय! आता पाहायचं की, खरंच न्याय मिळतो की या तरुणांची फसवणूक केवळ दलालांनी नाही, तर यंत्रणांनीही केली?