शिराढोण पोलिसांनी मोठ्या धडाक्यात कारवाई करत बेकायदेशीर दारू विक्रीचा पर्दाफाश केला. मात्र, आरोपी सोन्या शेळके हा पोलिसांच्या हातातून अगदी हिंदी सिनेमाच्या स्टाईलने निसटला!
घटनास्थळ – खामसवाडी शिवार. वेळ – दुपारी 2 वाजता. पोलिसांनी छापा टाकताच सोन्याने हॉटेलच्या मागच्या दारातून उडी मारली आणि धूम पळाली! पोलिसांनी घटनास्थळावर 15 बाटल्यांचा भव्य साठा हस्तगत केला. या बाटल्यांची एकूण किंमत तब्बल 1320 रुपये!
अस्सल मराठमोळ्या ‘टँगो पंच’ पासून ते ‘मॅक डावेल्स’ पर्यंतचा संग्रह पाहून पोलिसही अवाक झाले. इतक्या मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा बाळगणारा सोन्या शेळके हा स्वतःच्या फायद्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मात्र, पोलिसांनी दबा धरल्याचे समजताच सोन्याने काही क्षणातच अदृश्य होण्याची किमया साधली. उपस्थितांनी त्याचा वेग पाहून ‘गोल्डन चिता’ असाच टाईटल दिला. पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करून तपासात गती आणण्याचे ठरवले आहे.
(पोलिसांना एक सूचना: पुढच्या वेळी सोन्याला पकडण्यासाठी 100 मीटर स्प्रिंटपटूंच्या मदतीने छापा टाकावा!)
दारूचा धंदा, पोलीस कारवाई आणि ‘कल्याण’चा खेळ!
शिराढोण पोलिसांनी रविवारी मोठ्या थाटात बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र, हा गुन्हा दाखल करणारे आणि आरोपी पळवणारे एकाच साखळीचे दुवे आहेत का, हा संशोधनाचा विषय बनला आहे!
आरोपी अजित उर्फ सोन्या शेळके हा यापूर्वी पॉस्को गुन्ह्यात दोन वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे. असे असताना तो पुन्हा दारू विक्रीच्या धंद्यात कसा शिरला, आणि पोलिसांना बघताच ‘बॅकडोअर एंट्री’ने पळ कसा काढला, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, पकडलेला माल हॉटेलमध्ये दाखवला गेला, मात्र तो हॉटेल सहारा बाहेर सापडला. मग सहारा हॉटेलचे नाव गुन्ह्यात का आले नाही? हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
आता खरा मुद्दा: या संपूर्ण प्रकरणाचे तपास प्रमुख API नेहरकर यांचे बार अंबाजोगाईला असल्याची जोरदार चर्चा आहे! मग हॉटेलमधून जप्त केलेला माल नेमका कुठे गेला? गुन्ह्यात दाखल केलेला साठा आणि खरे जप्त केलेला साठा यामध्ये तफावत आहे का?
पोलिसांचा एक ‘कल्याणकारी’ ट्रॅक रेकॉर्ड:
दारू जप्तीची कारवाई करणारे अधिकारी आणि मालाचा हिशोब ठेवणारे लोक कोणाचे ‘कल्याण’ करतात, हे पाहणे मनोरंजक आहे. अशा ‘कल्याणकारी’ अधिकाऱ्यांची चौकशी झाली तर दारू धंद्यापेक्षा मोठा गोलमाल उघडकीस येण्याची शक्यता आहे!
- लोकांना पडलेला प्रश्न
दारूची रेड मुद्दाम रविवारीच का केली जाते ? चोप देणारे पीएसआय चोपणे कोणाचं नेमकं कल्याण करतात ?