धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सरकारी नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक सुरू होती. नळदुर्ग बसस्थानकासमोर मोबाईल शो-रूम चालवणारा अणदूरचा मोबाईल विक्रेता हा या काळ्या धंद्याचा प्रमुख खेळाडू असल्याचे समोर आले आहे.
“फक्त माहिती आली, तक्रार नाही!” – नळदुर्ग पोलिसांची सवयीची लीपापोती?
- फसवणुकीची तक्रार दिल्याचे फसवणूक झालेल्या तरुणांचे म्हणणे, पण नळदुर्ग पोलीस मात्र “फक्त माहिती आली, तक्रार नाही आली” असे सांगून गुन्हा नोंदवण्याचे टाळत आहेत.
- म्हणजे पोलिसांना तक्रार कधी “आली” असेल? जेव्हा आणखी किती तरी तरुण फसतील?
मोबाईल विक्रेत्याचा काळा धंदा – “नोकरी लावतो” म्हणून लाखोंचा गंडा!
- मोबाईल विक्रेता फक्त मोबाईल विक्री करत नव्हता, तर सरकारी नोकरीच्या नावाखाली काळे कारनामे करत होता!
- नोकरी लावतो म्हणून ३ ते १० लाख रुपये घेत होते.
- हा पैसा कमिशन खाऊन गट शिक्षणाधिकारी महिलेच्या दिवट्या चिरंजीवाला देत होता.
- दिवट्या चिरंजीव हा मोठ्या साहेबाच्या मेहुण्याला हा पैसा पुढे पाठवत होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच हा सारा प्रकार सुरू!
- सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतले जात होते आणि फसवणुकीची डील थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होत होती.
- तरुणांना मोबाईलवर बोगस नियुक्ती पत्र दाखवले जात होते, म्हणजेच संपूर्ण रॅकेट व्यवस्थित प्लॅनिंगने चालले होते.
फसवणूक झालेल्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना!
फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नळदुर्ग पोलिसात नोंदवावी तसेच धाराशिव लाइव्हकडे तिची प्रत पाठवावी.
धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
📞 ➡ संपर्क करा: 7387994411
“गुन्हा कधी?” की “तपास सुरूच?”
पोलिसांना हा गुन्हा नोंदवण्यासाठी आणखी किती वेळ लागणार? पोलिसांचा ‘तपास सुरूच’ मंत्र म्हणजे तपास चालू की ‘डील’ चालू? फसवणुकीच्या बळी ठरलेल्या तरुणांना न्याय मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे!
या प्रकरणात पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!