परंडा – तालुक्यातील कौडगाव आणि सोनारी येथे उसाचा ट्रॅक्टर बाजूला घेण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परंडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
दिगंबर अंकुश इटकर (वय ३२, रा. सोनारी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कौडगाव ते सोनारी रस्त्यावर आरोपी गोपाल तारासिंग चव्हाण, तात्या ठवरे, मंगेश गोफणे, पंकज ठवरे, बालाजी पारेकर, लक्ष्मण ठवरे, सहदेव औदुंबर गोफणे, महादेव केशव ठवरे आणि इतर एक (सर्व रा. कौडगाव) यांनी त्यांना उसाचा ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड व उसाने मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीच्या आधारावर परंडा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, १८९ (२), १९१ (१), १९१ (३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या गटाचे तात्या महादेव ठवरे (वय ४५, रा. कौडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सोनारी ते कौडगाव रस्त्यावर आरोपी दादा ईटकर, परमेश्वर पवार, सुमित दुबळे, अविनाश उर्फ पांडु हंगे, अतुल ईटकर आणि सचिन ईटकर (सर्व रा. सोनारी) यांनी त्यांना उसाचा ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीच्या आधारावर परंडा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, १८९ (२), १९१ (२), १९१ (३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास परंडा पोलीस करत आहेत.