• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बचाव

admin by admin
March 19, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बचाव
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या गाडीचा सोलापूर–पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. गुरुवारी मध्यरात्री भिगवणजवळील डाळज (ता. इंदापूर) परिसरात भरधाव कंटेनरने त्यांच्या फॉर्च्युनर कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा मोठा चक्काचूर झाला असला तरी सावंत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा थोडक्यात बचाव झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत धनंजय सावंत यांनी कुटुंबीय व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. कार्यक्रमानंतर ते फॉर्च्युनर कारने धाराशिवकडे परतत होते. मध्यरात्रीच्या सुमारास भिगवणजवळ मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या गाडीला चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, कारच्या ड्रायव्हर साईडचा पूर्ण भाग उद्ध्वस्त झाला. धडकेनंतर गाडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. मात्र एअरबॅग्ज उघडल्याने आणि नशिबाची साथ मिळाल्याने धनंजय सावंत यांना गंभीर दुखापत झाली नाही. चालक आणि अंगरक्षक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

धनंजय सावंत हे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे धाराशिवच्या राजकारणात आधीच खळबळ उडाली होती. त्यातच या अपघाताची बातमी समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र सावंत सुरक्षित असल्याची माहिती मिळताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

“कार्यकर्त्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी या भीषण संकटातून सुखरूप बाहेर आलो आहे. प्रकृती स्थिर असून कुणीही काळजी करू नये.”
— धनंजय सावंत (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद)

Previous Post

धाराशिव: आर्थिक तडजोड करून गाडी सोडल्याचा आरोप; पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन संशयास्पद असल्याचा अहवाल, मात्र अद्याप कारवाई नाही!

Next Post

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध अटक वॉरंट

Next Post
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध अटक वॉरंट

ताज्या बातम्या

‘मंत्र्यांची गाडी’ अचानक एसटीच्या दारात! ढाब्यावर गाडी थांबवून प्रवाशांची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रताप सरनाईकांचा थेट ‘ऑन दि स्पॉट’ दम

‘मंत्र्यांची गाडी’ अचानक एसटीच्या दारात! ढाब्यावर गाडी थांबवून प्रवाशांची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रताप सरनाईकांचा थेट ‘ऑन दि स्पॉट’ दम

September 24, 2026
टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

धाराशिवमध्ये ‘दुष्काळ’ नव्हे, आमदारांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चीच पाहणी!

September 24, 2026
टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

September 24, 2026
दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026

Recent Posts

  • ‘मंत्र्यांची गाडी’ अचानक एसटीच्या दारात! ढाब्यावर गाडी थांबवून प्रवाशांची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रताप सरनाईकांचा थेट ‘ऑन दि स्पॉट’ दम
  • धाराशिवमध्ये ‘दुष्काळ’ नव्हे, आमदारांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चीच पाहणी!
  • टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!
  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!