धाराशिव: आमदार सुरेश धस यांचे बोगस लेटरपॅड वापरून अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या आशिष विसाळवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
बनावट लेटरपॅड, खोटी सही आणि सरकारी अधिकाऱ्यांची फसवणूक
तथाकथित भामटा आशिष विसाळ हा स्वतःला आ. सुरेश धस यांचा वैयक्तिक सहाय्यक (पी.ए.) म्हणून सांगत अधिकाऱ्यांकडे दबाव तंत्र वापरत होता.
- बोगस लेटरपॅडवर खोटी सही करून सरकारी अधिकाऱ्यांवर चौकशी लादणे.
- “मी राज्यमंत्री आहे” अशी बतावणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावणे.
- तक्रारींवर कोणताही जावक क्रमांक नसतानाही, प्रशासनाने त्याची दखल घेणे.
- सरकारी कर्मचाऱ्यांकडून चौकशी टाळण्यासाठी खंडणी उकळणे.
“जिल्हाधिकाऱ्यांनी खातरजमा केली असती तर हा प्रकारच घडला नसता!”
विसाळ याने बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने धमकावले. जर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच आ. सुरेश धस यांच्याशी खातरजमा केली असती, तर हा प्रकार रोखता आला असता, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
“विसाळच्या सर्व अर्जांची पडताळणी करा!” – सुजित ओव्हाळ यांची मागणी
प्रशासनाने विसाळ याने दिलेल्या सर्व अर्जांची आ. सुरेश धस यांच्याशी संपर्क साधून पडताळणी करावी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजित ओव्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
प्रशासनाची गफलत की संगनमत?
बोगस लेटरपॅड आणि खोट्या सहीच्या आधारे अधिकाऱ्यांना धमकावले जात असताना, प्रशासनाने डोळेझाक का केली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
➡ पोलिस तपासाला गती – आणखी मोठ्या खुलास्यांची शक्यता!