• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव ग्रामीणमधील हाणामारी प्रकरण – एकाचा मृत्यू

जमावाचा पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या

admin by admin
February 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव ग्रामीणमधील हाणामारी प्रकरण – एकाचा मृत्यू
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटनांपैकी एका घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोठा जमाव थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आहे.

आरोपी नामे-केशव महादेव हराळे, महादेव रावण हराळे, वैष्णवी केशव हराळे, सहदेव प्रभु हराळे, राजुबाई महादेव हराळे, हणुमंत शहाजी हराळे सर्व रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांनी दि.02.02.2025 रोजी 12.00 वा. सु. सुग्रीव बाबु थोरात यांचे घरासमोर घाटंग्री येथे फिर्यादी नामे- कल्पना दिलीप हराळे, वय 40 वर्षे, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांचे सासरे नामे एकनाथ भिमा हराळे  यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉड, काठी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कल्पना हराळे यांनी दि.03.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 118(1) 115(2), 352, 189(2),191(1), 191(3), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी नामे-बंटी राठोड, अनिल राठोड दोघे रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांनी दि.03.02.2025 रोजी 07.45 वा. सु. बंटी राठोड यांचे टपरी जवळ सेवालाल चौक घाटंग्री येथे फिर्यादी नामे- कुसूम गोरख कांबळे, वय 45 वर्षे, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांचा मुलगा गोविंद कांबळे यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कुसुम कांबळे यांनी दि.03.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1) 115(2), 351(2)(3), 352, 3(5) सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(1)(आर), 3(1) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटनांपैकी एका घटनेत गंभीर जखमी झालेल्या एकनाथ भीमा हराळे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.  या पार्श्वभूमीवर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोठा जमाव थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आहे.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मोठा जमाव जमवला आहे. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. मृतदेह अँम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आला असून, पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.

पोलिसांकडून पुढील कारवाईची तयारी

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींवर आधीच गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत, मात्र आता मृत्यू झाल्याने अतिरिक्त कलमे लावली जातील का, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी निर्णय घेणार आहेत.

या प्रकरणातील पुढील अपडेट्स लवकरच मिळतील.

Previous Post

मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

रामलिंगचं माथेरान होणार… पण फोटोशॉपमध्ये!

Next Post
रामलिंगचं माथेरान होणार… पण फोटोशॉपमध्ये!

रामलिंगचं माथेरान होणार… पण फोटोशॉपमध्ये!

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!