धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकरी फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी नळदुर्ग पोलिसांनी केवळ चौकशीचे नाटक सुरू ठेवले आहे!
“तक्रार दिली, जबाब घेतला… पण गुन्हा नाहीच!”
- मंगळवारी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांत आपली तक्रार दिली होती.
- त्यांचा जबाबही पोलिसांनी नोंदवला होता.
- एक तरुण फिर्यादी म्हणून पुढे यायला तयार झाला, त्याचा जबाबही घेतला गेला.
- पण गुन्हा दाखल करायच्या ऐवजी पोलिसांनी जबाब आपल्या कपाटात बंद केला!
“गट शिक्षणाधिकारी बाईचा दिवटा चिरंजीव – आरोपातून सहीसलामत?”
- मुख्य आरोपीने फिर्यादी तरुणाला ‘मॅनेज’ केले!
- म्हणजेच, फसवणूक झालेल्यांनाच दबावाखाली आणून त्यांचा जबाब बदलण्याचा डाव!
- गुन्हा दाखल न होता सगळा प्रकार पोलीस ठाण्यातच थंड करण्यात आला.
“नळदुर्ग पोलिसांची ‘मॅनेजमेंट’ – मोठी पैशांची देवाणघेवाण सुरू!”
- या प्रकरणात मोठ्या रकमेची देवाणघेवाण सुरू असल्याच्या चर्चा आहेत.
- नळदुर्ग पोलीस दडपशाहीखालीच काम करत आहेत का?
- गुन्हा दाखल करायचा नाही, पण चौकशीच्या नावाने नाटक सुरू ठेवायचं – हाच प्लॅन दिसतोय!
“पोलीस निरीक्षक नांगरे गुन्हेगारांसोबत चहा पितायत?”
- या संपूर्ण प्रकरणावर पोलीस निरीक्षक नांगरे यांना फोन केला असता त्यांनी तो उचलला नाही!
- साहेब फोन उचलत नाहीत, म्हणजे बहुतेक आरोपींसोबत चहापाणी सुरू असावे!
“फसवणूक झालेल्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना!”
फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नळदुर्ग पोलिसात नोंदवावी तसेच धाराशिव लाइव्हकडे तिची प्रत पाठवावी.
धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
📞 ➡ संपर्क करा: 7387994411
“गुन्हा होणार की फाईल कपाटातच राहणार?”
पोलिसांनी गुन्हा कपाटात ठेवला, तरुणांना गप्प बसवले, आरोपी मोकळे फिरतायत! आता हा गुन्हा खरेच दाखल होईल का, की “तपास सुरू आहे”च्या नावाखाली पुन्हा चहापाणीच होईल?
या प्रकरणात पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!