• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर पोलीस ठाण्यात “पवनचक्की गुत्तेदारांचे” शक्तिप्रदर्शन

– बॉडीगार्ड, पिस्तूल आणि VIP बडेजाव!

admin by admin
February 7, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजापूर पोलीस ठाण्यात “पवनचक्की गुत्तेदारांचे” शक्तिप्रदर्शन
0
SHARES
2.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  तुळजापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सध्या “पवनचक्की गुत्तेदारांचे” अवतार काही वेगळ्याच पातळीवर गेले आहेत. पोलीस ठाणे म्हणजे काय, एकदम 5 स्टार हॉटेलसारखं वाटावं अशी या गुत्तेदारांची एन्ट्री! आलीशान गाड्यांमधून उतरणारे हे महाशय, कमरेला चकचकीत पिस्तूल, आणि सोबत WWE मध्ये काम करता का? असा प्रश्न पडेल अशी बॉडीगार्डची फौज!

आता प्रश्न असा आहे की, हे पवनचक्की गुत्तेदार पोलीस ठाण्यात रोज-रोज काय करतात? तक्रार देतात की तक्रार घेतात? की पोलीस ठाण्यात स्वतःची शाखा उघडलीय? गावकरी म्हणतात की, ‘हे गुत्तेदार पवनचक्कीपेक्षा पिस्तूलच जास्त फिरवतायत!’

तुळजापूर आहे की बिहार?

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी या पवनचक्की कंपन्यांच्या दादागिरीला जोरदार प्रतिकार केल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. पण आता तर गुत्तेदारांचे लाड वेगळ्याच लेव्हलला पोहोचलेत. ‘आम्ही VIP आहोत’ असा आव आणत खुलेआम शस्त्रप्रदर्शन करणाऱ्या या मंडळींना कायद्याची भीती नाही का?

पोलीस ठाण्यात या गुत्तेदारांची मुजोरी वाढत चालली आहे, आणि त्यांना उघडपणे पिस्तूल लटकवायची मुभा दिलीय की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. शेतकरी विचारतायत, “आम्हाला रक्षण पोलीस करणार की गुत्तेदारांच्या पिस्तुलांपासून स्वतःच वाचायचं?”

पवनचक्की ठेकेदार की नामांकित गुंड?

सदर गुत्तेदारांवर आधीच गुन्हे दाखल आहेत, तरीही हे महाशय आपल्या बॉडीगार्डसह पोलिस स्टेशनात उभे राहतात, जणू काही त्यांनीच कायदा लिहिला आहे! पोलिस ठाण्याच्या आवारात गाड्या लावायच्या, छाती पुढे काढून फिरायचं, आणि जनतेला “बघून घ्यायला” धमकवायचं, असा काहीसा प्रकार सुरु आहे.

आता पोलिसांनी ठरवायचं – हे “वन-वे” गुत्तेदारांचं शस्त्र प्रदर्शन असंच चालू राहणार, की पोलिस “टू-वे” ॲक्शन प्लॅन काढून यांना आळा घालणार?

धाराशिवचे पोलीस अधीक्षक आता यावर काय भूमिका घेतात याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलंय. गुत्तेदारांसाठी पोलीस ठाण्याचा परिसर “व्हीआयपी पार्किंग झोन” राहणार की पोलिस प्रशासन खरंच जनतेच्या बाजूने उभं राहणार? हा प्रश्न सध्या तुळजापूरभर गाजतोय!

Previous Post

धाराशिवच्या रस्त्यांवर ‘अतिक्रमण’ हटावचा फार्स

Next Post

धाराशिव नगरपालिकेत ‘ऑल राउंडर’ विद्युत अभियंता!

Next Post
धाराशिव नगरपालिकेत ‘ऑल राउंडर’ विद्युत अभियंता!

धाराशिव नगरपालिकेत ‘ऑल राउंडर’ विद्युत अभियंता!

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group