मुरुम – मागील भांडणाचा राग मनात ठेवून चौघांनी मिळून एका तरुणावर लाथाबुक्यांनी, काठी आणि दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच, “याला जिवंत सोडू नका” अशी धमकी देत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे घडली. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवचलप्पा रामचंद्र माळी (वय 37, रा. केसरजवळगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांच्यावर दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर हल्ला करण्यात आला. आरोपी सुर्यकांत विश्वनाथ माळी, अनिल सुर्यकांत माळी, सुनिल सुर्यकांत माळी आणि पद्मावती सुर्यकांत माळी (सर्व रा. केसरजवळगा) यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी तसेच, काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली. हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी शिवचलप्पा माळी यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
गाई बांधण्याच्या कारणावरून वयोवृद्धावर हल्ला
वाशी – गाई बांधण्याच्या कारणावरून वयोवृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडू परसराम जाधव (वय 70, रा. सरमकुंडी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्यावर दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता हल्ला करण्यात आला. आरोपी तुकाराम लक्ष्मण गायकवाड, प्रियंका तुकाराम गायकवाड, लक्ष्मण गायकवाड आणि अशाबाई लक्ष्मण गायकवाड (सर्व रा. सरमकुंडी) यांनी गाई बांधण्याच्या कारणावरून वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी आणि वेळूच्या काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.
या प्रकरणी दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी खंडू जाधव यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.