अणदूर – वळसंग ते चिवरी ४०० के.व्ही. टॉवर्सच्या कामाच्या नावाखाली काहींनी चांगलाच ‘हाय व्होल्टेज’ प्लॅन आखला होता, पण आता त्यांच्या हातात केवळ ‘शॉर्ट सर्किट’ उरलंय! गावकऱ्यांना आणि ठेकेदारांना वीजेचा धक्का लागू नये म्हणून झटणाऱ्या काही लोकांनीच स्वतःला जबरदस्त ‘करंट’ लावून घेतलाय!
‘एक लाख माझा, एक लाख त्याचा आणि शेतकऱ्यांचा काय? – वीजेचा धक्का!’
या ‘बिजली माफिया’ने अगदी सरळ गणित मांडलं होतं – “काम करायचं असेल तर मला एक लाख, माझ्या सहकाऱ्याला एक लाख, आणि शेतकऱ्यांना एक-दोन लाख दिले, तरच लाईट जळणार!” पण या ‘टॉवर मॅनेजर्स’चा ओव्हरलोड झाला, कारण त्यांनी नळदुर्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रारीसोबत ऑडिओ रेकॉर्डिंग जोडलेले आहे!
गावच्या ‘आका-बोक्यांना’ पोलिसांचा ‘करंट’ बसणार?
नळदुर्ग पोलिसांनी लाच मागणाऱ्या तिघांविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली आहे. आता प्रश्न असा आहे की – पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करणार का? की तेही ‘लोडशेडिंग’ सुरू ठेवणार?
धाराशिव LIVEचा ‘पॉवरफुल’ खुलासा – येतोय मोठा वीज धक्का!
आता अणदूरमधील ‘आका’ आणि ‘आकाचा बोका’ यांचे धाबे दणाणले आहेत! धाराशिव LIVE लवकरच या टॉवर गडबडीचा मोठा पर्दाफाश करणार आहे. तोपर्यंत गावकऱ्यांनी ‘बिजली गई’ म्हणू नये, कारण येथे वीज येण्यापूर्वीच ‘करंट’ आलेला आहे! 🔥⚡