नळदुर्ग – कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी अथवा प्रमाणपत्र नसताना रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी एका बोगस डॉक्टरविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी डॉ. निरापद अनिल बानर्जी (वय 60, रा. बोली, जि. सवाई माधोपुर, राजस्थान, सध्या ह.मु. उमरगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी मागील पाच महिन्यांपासून कोणत्याही अधिकृत वैद्यकीय पात्रतेशिवाय वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून अनेक रुग्णांकडून पैसे घेतले आणि त्यांची फसवणूक केली. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण झाला होता.
या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. म. र. फीकोद्दीन म. कबीरोद्दीन अन्सारी (वय 52, रा. धाराशिव) यांनी 3 मार्च 2025 रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 319(2), 318(4), तसेच इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट 1958 च्या कलम 15 आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिसेस ॲक्ट 1961 च्या कलम 33(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.