धाराशिव: शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ४२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता पीडित मुलगी शेतातील लिंबाच्या झाडाखाली खेळत असताना, गावातील आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच दिवशी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ६४(२)(आय), ६५(२), १३७(२) आणि पॉक्सो कायदा ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.