धाराशिव – ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीमुळे उपळा (मा.) येथील हरिभाऊ घोगरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत सुरू असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. आज झालेल्या गणित भाग 1 च्या पेपरवेळी शिक्षण विभागाने विशेष लक्ष ठेवले.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाशी संबंधित अनेकांनी ती शेअर केली, त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली. आजच्या परीक्षेसाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आणि परीक्षेच्या संपूर्ण वेळेत ते प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सतत फिरत राहिले.
केंद्र संचालकाने चौकशी पथकाला गप्पा मारून विषय हलका करण्याचा प्रयत्न केला, पण पथकाने त्याकडे फारसा लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम म्हणून आजची परीक्षा बहुतांशी अनुशासित आणि कॉपीमुक्त झाली असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.
या प्रकारामुळे जिल्ह्यातील इतर परीक्षा केंद्रांवरही शिस्त आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांची उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी, ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास हातभार लागल्याचे दिसते.
(या प्रकरणाचा पुढील तपशील लवकरच…)